Ezekiel 29:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो: “मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस. तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे! मी ही नदी निर्मिली”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याबरोबर बोल; त्याला सांग: प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे मिसर देशाच्या फारो राजा, आपल्या नद्यांत पडून राहणार्‍या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की, ‘नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे,’ त्या तुझ्याविरुद्ध मी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व म्हण ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मिसराचा राज फारो, मी तुझ्याविरूद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी, तू मला म्हणतोस, “ही नदी माझी आहे. ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे.”