Ezekiel 29:5 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला व तुझ्या नद्यांतल्या सर्व माशांना सोडून देईन; तू उघड्या मैदानात पडून राहशील; तुला कोणी उचलून आणणार नाही किंवा तुझी कोणी जुळवाजुळव करणार नाही, तर तू वनपशूंना व आकाशातील पाखरांना खाद्य होशील असे मी करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना वाळवंटात सोडून देईन. तू मोकळ्या मैदानात पडशील आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार. पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी तू खाद्य होशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला आणि तुझ्या नद्यांतली सर्व मासे यांनाही रानात खाली टाकून देईन; तू शेतातल्या उघड्या भूमीवर पडशील; तुला कोणी एकवट करणार नाही किंवा उचलून घेणार नाही. मी तुम्हास भूमीवरच्या पशूंस व आकाशातल्या पक्षांना भक्ष्य असे देईन.