Ezekiel 3:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्मा फार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!