Ezekiel 3:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर मी, तेल अबीब येथे सक्तीने राहत असलेल्या इस्राएली लोकांकडे गेलो. ते खबार कालव्याजवळ राहात होते. तेथे राहणाऱ्या लोकांना मी अभिवादन केले. मी त्यांच्याबरोबर सात दिवस भीतिग्रस्त होऊन गप्प बसून राहिलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे सात दिवस राहिलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो.