Ezekiel 3:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण तू सज्जन माणसाला सावध केलेस आणि पाप न करण्याबद्दल सांगितलेस आणि त्याने पाप करण्याचे सोडून दिले, तर तो मरणार नाही. का? कारण तू सांगितले आणि त्याने ऐकले. अशा प्रकारे तू तुझा स्वत:चाच जीव वाचविला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले, व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही.