Ezekiel 30:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर व त्याचे लोक भयंकर आहेत आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन. ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील. ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो व सर्व लोकांमध्ये भयंकर असे त्याचे लोक ह्यांना ह्या देशाचा नाश करायला आणीन; ते मिसरावर आपल्या तलवारी उपसून वधलेल्या मनुष्यांनी सर्व देश भरून टाकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत; त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल. ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.