Ezekiel 30:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल. मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल. मिसरला ढग झाकेल आणि त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसर्यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.