Ezekiel 30:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. “मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील; मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलच्या राजाच्या हाती तलवार देईन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.