Ezekiel 30:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी त्या निश्‍चिंत कूशी लोकांना घाबरवून सोडण्यासाठी माझ्याकडील जासूद जहाजात बसून जातील; मिसरावर प्रसंग आला तेव्हाच्याप्रमाणे त्यांना वेदना होतील; कारण पाहा, तो प्रसंग येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!