Ezekiel 31:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अन्य राष्ट्रांतल्या भयंकर परक्या लोकांनी त्याला छेदून टाकले व फेकून दिले: त्याच्या डाहळ्या पर्वतांवर व सर्व खोर्‍यांत पडल्या आहेत; देशातल्या सर्व नाल्यानाल्यांतून त्याच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत; त्यांनी त्याला सोडले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्‍यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्‍यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्यास तोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे.