Ezekiel 31:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासही जावयास लाविले आहे.