Ezekiel 31:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह ह्यांची अशी गती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील. “ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”