Ezekiel 31:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा एवढ्या फांद्या नव्हत्या देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या, अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या. देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष, ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या बागेतील देवदारूने त्याला झाकून टाकता येईना; सुरूच्या फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या; अर्मोनवृक्ष त्याच्या शाखांच्या तोडीचा नव्हता; देवाच्या बागेतील कोणतेही झाड त्याची बरोबरी करणारे नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या बागेतील देवदारू त्याच्याशी तुलना करू शकत नसे, गंधसरू त्याच्या फांद्यांची बरोबरी करू शकली नाही, ना अर्मोनवृक्षाची त्याच्या डहाळ्यांशी तुलना झाली; परमेश्वराच्या बागेतील कोणतेही वृक्ष त्याच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते.