Ezekiel 32:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्याकडे पाहून खूप लोकांना धक्क बसेल. मी माझी तलवार परजताच, त्या लोकांचे राजे अत्यंत भयभीत होतील. तुझ्या पतनाच्या दिवशी, क्षणाक्षणाला, ते थरथर कापतील. प्रत्येकाला आपल्या जीवाचे भय वाटेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन; मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील; तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक लोक तुझ्याकडे पाहून भयचकित होतील असे मी करेन, जेव्हा त्यांच्यासमोर मी माझी तलवार चालवेन तेव्हा त्यांचे राजे तुझ्यामुळे भयाने कापतील, तुझे पतन होईल त्या दिवशी सर्वजण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भयभीत होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.