Ezekiel 32:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लढाईत, त्या सैनिकांकरवी मी तुमचे लोक मारीन. ते सर्वांत भयंकर अशा राष्ट्रांतून आलेले सैनिक आहेत. मिसरच्या अभिमानास्पद गोष्टी ते लुटतील. मिसरच्या लोकांचा नाश केला जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वीरांच्या तलवारींनी मी तुझा लोकसमूह पाडीन; ते सर्व राष्ट्रांतले भयंकर पुरुष आहेत; ते मिसराचा गर्व हरण करतील; त्यांच्या सर्व लोकसमूहाचा विध्वंस होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रांतील जे सर्वात क्रूर अशा बलवान मनुष्यांच्या तलवारीने मी तुझे सैन्य पाडून टाकीन. इजिप्तचा अहंकार ते मोडून टाकतील, आणि तिच्या सर्व सैन्यांचा नाश होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.