Ezekiel 32:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी मिसरची भूमी ओसाड करीन. त्यातील सर्व काही नष्ट होईल मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना मी शिक्षा करीन. मगच त्यांना ‘मी देव व प्रभू’ असल्याचे समजेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मिसर देशातील सर्व रहिवाशांना मारून त्या देशांचे अरण्य करीन व देशातले सर्वकाही नाहीसे करून तो उजाड करीन, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.