Ezekiel 32:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो ह्याच्यासाठी हे शोकगीत गा. त्याला सांग: “तू स्वत:ला राष्ट्रांमध्ये उन्मत्तपणे चालणारा बलिष्ठ तरुण सिंह समजलास. पण खरे म्हणजे तू तळ्यांतील मगरी प्रमाणे आहेस. तू प्रवाहातून रेटा देऊन मार्ग काढतोस तुझ्या पायाने पाणी गढूळ करतोस, मिसरच्या नद्या घुसळून काढतोस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याविषयी विलाप कर; त्याला सांग, राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानदातल्या मगरासमान आहेस; तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी गढूळ केलेस, व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केलीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्‍यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्‍यात चिखल केलास.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.