Ezekiel 32:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी एलाम व युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी शय्या तयार केली. एलामच्या थडग्याभोवती त्याचे सैनिक आहेत. ते सर्व परदेशी युद्धात मारले गेले. ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी लोकांना घाबरविले. पण जमिनीखाली खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. त्यांना मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर ठेवले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी तिच्यासाठी व तिच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यांमध्ये शय्या तयार केली आहे; तिच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; ते सर्व बेसुंती इसम तलवारीने ठार झालेले आहेत; त्यांनी जिवंतांची भूमी दहशतीने भरली म्हणून गर्तेत उतरणार्यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत; वधलेल्यांमध्ये त्यांना ठेवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.