Ezekiel 32:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते वीरांना दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांच्या आधी मेलेल्या दुष्ट पुरातन बेसुंती योद्ध्यांबरोबर ते निजलेले नाहीत, जे त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांसह खाली अधोलोकात गेले; ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली व त्यांच्या ढाली त्यांच्या हाडांवर आहेत; या योद्ध्यांनी सुद्धा जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे.