Ezekiel 32:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“उतरेकडचे सर्वच्या सर्व राज्याकर्ते तेथे आहेत. सीदोनचे सर्व सैनिकही तेथे आहेत. त्यांच्या बळाला लोक घाबरले. पण ते आता शरमले आहेत. ते परदेशी, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्यामध्ये पडून आहेत. त्यांनी त्या खोल विवरात जाताना स्वत:ची अप्रातिष्ठाही स्वत:बरोबर नेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्तरेकडील सरदार व वधलेल्यांबरोबर उतरून गेलेले सीदोनी हे सर्व तेथे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा वचक बसला होता तरी त्यांची अप्रतिष्ठा झाली; ते बेसुंती लोक तलवारीने वधलेल्यांबरोबर पडले आहेत व गर्तेत उतरणार्यांबरोबर अप्रतिष्ठा पावले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तीशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.