Ezekiel 33:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, ‘तू मरशीलच,’ आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले,