Ezekiel 33:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्‍याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल.