Ezekiel 33:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जर पहारेकर्याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्याजवळ मागेन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्याकडून घेईन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन.