Ezekiel 33:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन.