Ezekiel 36:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले. तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव धुळीला मिळवले, राष्ट्रे त्यांच्याबद्दल बोलली. ती म्हणाली, ‘हा परमेश्वर आहे तरी कसा? हे परमेश्वराचे लोक आहेत, पण त्यांनी त्याची भूमी सोडली.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि राष्ट्रांमध्ये ते जिथे कुठे गेले त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला, कारण त्यांच्याविषयी असे म्हटले गेले होते, ‘हे याहवेहचे लोक आहेत, तरीही याहवेहचा देश त्यांना सोडावा लागला.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे.