Ezekiel 36:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग की परमेश्वर, प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘इस्राएल लोकानो, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव बदनाम केलेत. हे थांबविण्यासाठी मी काहीतरी करीन. ते मी तुमच्यासाठी म्हणून करणार नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, मी हे तुमच्याकरता करत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे.