Ezekiel 36:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वतांशी बोल. त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू असे सांगतो ‘शत्रूने तुमची शहरे नष्ट केली, सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांचे व्हावे म्हणून त्याने असे केले. मग लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील. तुमची निंदानालस्ती करतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हांला उद्ध्वस्त केले आहे, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर ताबा बसावा म्हणून त्यांनी तुम्हांला चोहोकडून ग्रासले आहे, आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यांना तुम्ही निंदेचा विषय झाला आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”