Ezekiel 36:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या असे मला वाटते. तुमच्या भल्याकरिता मी ह्या गोष्टी करीत नाही. मी माझ्या नावाकरिता त्या करीत आहे म्हणून इस्राएल लोकांनो, तुम्ही ज्या तऱ्हेने जगलात, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही ओशाळे झाले पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुमच्याकरता करीत नाही हे तुम्हांला ठाऊक असू द्या; हे इस्राएल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजीत व्हा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरिता हे करत नाही, हे तुम्हास माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा.