Ezekiel 36:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाटसरु म्हणतील, ‘पूर्वी, ह्या प्रदेशाचा विद्ध्वंस झाला. पण आता तोच एदेनच्या बागेप्रमाणे झाला आहे. शहरांचा नाश झाला. ती उद्ध्वस्त व ओसाड झाली. पण आता ती सुरक्षित आहेत आणि त्यांत लोकांनी वस्ती केली आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणतील, ‘ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत.