Ezekiel 36:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून मी वचन देतो की माझ्या बोलण्यात आवेश असेल. मी अदोम आणि इतर राष्ट्रांना माझा राग जाणवून देईन. माझी जमीन त्या लोकांनी स्वत:साठी घेतली, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ती फक्त लुटण्यासाठी आणि नाश करण्यासाठी घेतली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम ह्यांनी उल्लासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला; ह्यास्तव मी त्यांच्याविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्चितपणे बोललो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेह म्हणतात: माझ्या पेटलेल्या आवेशात बाकी राष्ट्रांच्या विरुद्ध, आणि एदोमविरुद्ध मी बोललो, कारण त्यांच्या हृदयातील उल्हास व द्वेषाने त्यांनी माझ्या देशातील कुरणे लुटावी म्हणून त्याला आपलेच वतन करून घेतले.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.”