Ezekiel 36:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून, परमेश्वर माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: म्हणून माझ्यावतीने इस्राएल देशाशी बोल. पर्वत, टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो मी आवेशाने आणि रागाने बोलेन. का? कारण, इतर राष्ट्रांकडून तुम्हाला अपमान सहन करावा लागला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल देशाविषयी संदेश देऊन पर्वत व टेकड्या, नाले व खोरी ह्यांना सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, परराष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुम्ही साहिली आहे म्हणून, पाहा, मी आपल्या ईर्ष्येने व संतापाने बोललो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून इस्राएल देशासंबंधी भविष्यवाणी कर आणि पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही राष्ट्रांचा अपमान सहन केला म्हणून मी माझ्या ईर्षेच्या क्रोधात बोलतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हास राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.”