Ezekiel 37:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.