Ezekiel 37:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.” परमेश्वरच हे सर्व बोलला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”