Ezekiel 37:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, एफ्राइमाच्या हाती असलेला योसेफाचा ढलपा व त्याचे सोबती इस्राएल वंशज ह्यांना घेऊन यहूदाच्या ढलप्याशी जोडून त्यांचा एक ढलपा मी करीन, म्हणजे ते माझ्या हातात एकजीव होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील.