Ezekiel 37:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते यापुढे स्वत:ला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणांला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी1 पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.