Ezekiel 37:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो मला म्हणाला, “वार्याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.”