Ezekiel 38:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू म्हणशील, ‘ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यांवर मी चढाई करीन; जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, व ज्यांपैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत त्यांच्यावर मी चालून जाईन;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यंत जाईन; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.