Ezekiel 38:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्या लोकांचा पराभव करुन, त्यांची मौल्यावान संपत्ती लुटीन. पूर्वी नाश झालेल्या, पण आता लोक राहात असलेल्या स्थानांशी मी लढेन. इतर राष्ट्रांतून गोळा झालेल्या लोकांशी (इस्राएलशी) मी लढेन. आता त्यांच्याजवळ गुरेढोरे व मालमत्ता आहे. ते जगाच्या चौकात रहातात. शक्तिशाली देशांना इतर शक्तिशाली देशांकडे जाण्यासाठी त्या प्रदेशातून प्रवास करावाच लागतो.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांची मालमत्ता हिरावण्यासाठी व लुटालूट करण्यासाठी; ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा, आणि निरनिराळ्या राष्ट्रांतून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांच्यावर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशासाठी की, तू लूट करावी व शिकार धरावी, आणि जी उजाड स्थाने वसली आहेत त्यावर, व जे लोक राष्ट्रांमधून एकवटलेले आहेत, ज्यांनी गुरे व धन ही प्राप्त करून घेतली आहेत, जे पृथ्वीच्या मध्यभागी वसतात त्यांच्यावरही तू आपला हात चालवावा.