Ezekiel 38:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“शबा, ददान, दार्शीशचे व्यापारी आणि त्यांच्याबरोबर व्यापार करणारी सर्व गावे तुला विचारतील ‘तू मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यास आलास का? चांगल्या गोष्टी बळकावण्यासाठी व सोने, चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता लुटून नेण्यासाठी तू आपल्या सैन्याच्या जथ्याला घेऊन आला आहेस का? सर्व अमूल्य वस्तू घेण्यासाठी तू आला आहेस का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शबा, ददान आणि तार्शीश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, ‘तू लुटालूट करण्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमवला आहेस काय? सोनेरुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हास तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”