Ezekiel 38:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी रोगराई व मृत्यू ह्याद्वारे गोगला शिक्षा करीन. गोग व पुष्कळ राष्ट्रांतून गोळा झालेल्या त्याच्या सैन्यावर गारा, आग व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.