Ezekiel 38:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला पळ काढायला लावीन; तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार ह्यांना बाहेर काढीन; सर्व जण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी तुला पाठमोरा करीन आणि तुझ्या जाभाडात आकडा घालीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व घोडेस्वार यास बाहेर काढीन; ते सर्वजण पूर्ण चिलखत घालून, मोठ्या व लहान ढाली धारण केलेला, त्यासर्वांनी तलवारी धरलेला असा मोठा समुदाय मी पाठवीन.