Ezekiel 38:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुष्कळ काळानंतर तुम्हाला कामाकरिता बोलविण्यात येईल. पुढील काळात युद्धातून तरलेल्या प्रदेशात, तुम्ही याल. ह्या प्रदेशातील लोकांना पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतून गोळा केले जाईल आणि इस्राएलच्या पर्वताकडे परत आणले जाईल. पूर्वी इस्राएलच्या पर्वतांचा पुन्हा पुन्हा नाश केला गेला. पण हे लोक इतर राष्ट्रांतून परत येतील. ते सर्वच्या सर्व सुरक्षित राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुष्कळ दिवसानंतर तुम्हास बोलविण्यात येईल. जो देश तलवारीपासून घेतलेला आहे व पुष्कळ राष्ट्रांतील लोकांपासून मिळवलेला आहे, त्यामध्ये इस्राएलाचे पर्वत सर्वदा ओसाड होत असत त्यावर तू शेवटल्या वर्षामध्ये येशील; तथापि तो देश लोकांतून काढून घेतलेला आहे आणि ते सर्व निर्भय राहतील