Ezekiel 39:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “त्या मेलेल्या सैनिकांना पुरण्यासाठी, कामगारांना, पूर्ण वेळचे काम द्यावे लागेल. अशा रीतीने, ते देशाला शुद्ध करतील. त्या कामगारांना सात महिने काम करावे लागेल. ते भोवताली प्रेतांचा शोध घेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे काम नेहमी करणारे इसम ते वेगळे करून नेमतील आणि देश शुद्ध व्हावा म्हणून ते इसम देशभर हिंडून जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांना पुरतील; सात महिने लोटल्यावर ते शोधाला लागतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि तो देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील.