Ezekiel 39:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यासाठी कापलेल्या माझ्या यज्ञपशूंची वपा तुम्ही तृप्ती होईपर्यंत खाल व त्यांचे रक्त पिऊन मस्त व्हाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्यांचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल.