Ezekiel 39:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले.