Ezekiel 39:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना राष्ट्रांतून परत आणीन, त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना जमा करीन व बहुत राष्ट्रांसमक्ष त्यांच्या ठायी आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा हे घडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी त्यांना राष्ट्रांतून परत आणेन आणि त्यांच्या शत्रूंच्या देशांमधून त्यांना एकत्र करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे अनेक राष्ट्रांच्या दृष्टीत मी पवित्र मानला जाईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल.