Ezekiel 39:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तेव्हा जे इस्राएलच्या नगरात राहतात ते बाहेर जातील आणि इंधन म्हणून आपली हत्यारे; म्हणजेच लहान व मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, युद्धाच्या बरच्या व भाले जाळतील. ते सात वर्षे इंधनासाठी त्यांचा उपयोग करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील.