Ezekiel 4:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी (यहेज्केल) म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, पण मी कधीच अमंगळ अन्न खाल्लेले नाही. एखाद्या रोगाने मेलेल्या प्राण्याचे अथवा हिंस्त्र प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस मी कधीच खाल्लेले नाही. बालपणापासून आजपर्यंत मी कधीच अमंगळ मांस खाल्लेले नाही. असे काहीही मी कधीच तोंडात घातलेले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, असे नको! मी स्वतःला कधी विटाळले नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मेलेले किंवा जंगली जनावरांनी फाडलेले असे मी काहीही खाल्ले नाही. कोणतेही अशुद्ध मांस माझ्या मुखात कधीही गेले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”