Ezekiel 4:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आणखी म्हणाला, “मानवपुत्रा, पाहा, मी यरुशलेमेत भाकरीचा आधार तोडीन म्हणजे लोक कष्टी होऊन भाकर तोलून खातील, व भयभीत होऊन पाणी मापून पितील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.