Ezekiel 4:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव असेही म्हणाला, “तू भाकरीसाठी थोडे धान्य मिळविले पाहिजे. गहू, सातू, कडधान्य, मसूर, मक्का व खपल्या गहू घे. तो एका भांड्यात एकत्र करुन दळ. भाकरी करण्यासाठी तू हे पीठ वापरशील. तू एका कुशीवर 390 दिवस झोपला असताना फक्त ह्याच पिठाच्या भाकरी खाशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काठ्या गहू घेऊन एका पात्रात घाल व आपल्यासाठी त्याची भाकर कर; तू आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने तीनशे नव्वद दिवस तुला ती खायची आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.